ना. देसाईंचा राजीनामा स्विकारला नाही : शिवसेना

0
मुंबई | उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी आज सकाळी त्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. परंतू मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी तो नाकारला असलाचे प्रसिध्दपत्रक शिवसेनेच्या राज्य संपर्क कार्यालयाने काढले आहे.

यात म्हटले आहे की, ना. देसाई हे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी मुख्यंमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत मी राजीनामा स्वीकारणार नसल्यासे स्पष्ट केले. चौकशीअंती येणार्‍या अहवालाचा निष्कर्ष योग्यवेळी पाहू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्री यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आणि ना. देसाईंचा राजीनामा स्विकारणार नसल्याचे स्पष्ट केले.

काल रात्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत झालेल्या एकूण प्रकरणाबाबत चर्चा केली.

चौकशीला पूर्ण सहकार्य : ना. देसाई

यावेळी ना. देसाई म्हणाले की, चौकशीच्या काळात मंत्रीपदावर आपण राहू नये असे वाटले म्हणून राजीनामा देवू केला. परंतू मुख्यमंत्र्यांनी तो स्विकारला नाही. आता चौकशीला पूर्ण सहकार्य करणार व येणारे निष्कर्ष मान्य राहणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाले शिवसेना पक्ष प्रमुख
– राजकारणाची पातळी खूप घसरलेली आहे
– आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत
– यांना स्वतःच्या कृत्याची लाज वाटत नाही हे भयानक आहे
– आरोप कर राजीनामा घे पायंडा पडला तर महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नाही
– सुभाष देसाईंनी माझ्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार त्यांनी राजीनामा सादर केला मात्र मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला
– मुख्यमंत्र्यांनी निःपक्षपाती चौकशी करण्याचे वचन दिले आहे, तशी चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल ही अपेक्षा.
– पक्ष देसाईंच्या पूर्णपणे पाठीशी आहे.

LEAVE A REPLY

*