अमळनेर खान्देश शिक्षण मंडळाच्या बोगस भरती प्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करा : जि.प सदस्या माधुरी अत्तरदे

0
जळगाव |  प्रतिनिधी : जिल्ह्यातील खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर संचलित विविध माध्यमिक शाळांमध्ये २०१३ मध्ये अनधिकृतरित्या पदभरती करण्यात आलेली आहे.

भरतीस तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी जाहीरातीस अथवा भरतीस कोणतीही परवानगी दिलेली नसतांना तसेच शासनाने २०१२ पासून भरतीस बंदी असतांना संस्थाचालकांनी शिक्षणविभागाच्या सहकार्याने भरती प्रकिया राबविली.

त्यामुळे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह लिपीकाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी निवेदनाद्वारे सीईओ यांच्याकडे केली आहे.

सन २०१३ ते १७ या कालावधीत २२ शिक्षकांसह १ ग्रंथपाल यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. संस्थेत पदभरती करतांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असतांना संस्थाचालकांनी कोणाचीही परवानगी न घेता पदभरती केली आहे.

पदभरती करतांना परवानगी घेतली आहे का याची माहिती माहिती अधिकारातुन मागितली आहे. माहिती अधिकारात उत्तर देतांना सामान्य प्रशासन विभागाने नोंदणी शाखेतील सर्व अभिलेखाची तपासणी करुन कार्यालयात पदभरती संदर्भातील कोणतेही पत्र प्राप्त झालेले नसून टपाल व्यवहार करण्यात आलेले नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

पदभरती करण्याच्या परवानगीसाठी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची माहिती तक्रारदारांनी शिक्षणविभागाकडून मागितली असता शिक्षणविभागाकडून शिक्षण संचालक, उपसंचालक, आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.

मात्र सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती मागितली असता कोणतेही पत्राची नोंद नसल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार माधुरी अत्तरदे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*