सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलिसावर गुन्हा दाखल करा !

0
जळगाव | प्रतिनिधी :  एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील व पोलिस कर्मचारी जितेंद्र पाटील व नेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी गणपती नगरातील रहिवाशी वैशाली व्हडगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसल्या आहे.

उपोषणकर्त्या वैशाली व्हडगर यांनी दिलेल्या माहितीवरून त्याचे पती बिरदेव व्हडगर यांचा राजेश पाटील हा मानलेला भाचा आहे. त्याला हाताशी धरून एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील, पोलिस कर्मचारी जितेंद्र पाटील व नेरकर यांनी बिरदेव व्हडकर यांना तुमच्या विरोधात तक्रार असून दि.२२ नोव्हेंबर २०१६ रोजी १ लाख रुपये न दिल्यास खोटया गुन्हात अडकवून टाकण्याची धमकी दिली.

त्यानुषंगाने बिरदेव व्हडगर यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील, जितेंद्र पाटील व नेरकर यांना पोलिस स्टेशनच्या आवारात शितल काळे व प्रमोद इंगळे यांच्या समक्ष १ लाख रुपये दिले. तसेच राजेश पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले असे जबरदस्तीने लिहून घेतले.  उर्वरित ४ लाखांसाठी वेळोवेळी मागणी केली.

याबाबत बिरदेव व्हडगर यांनी दि.१४ मार्च २०१७ रोजी याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली. तरी देखील या तक्रारीची कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे बिरुदेव व्हडगर यांच्या पत्नी वैशाली व्हडगर सपोनि समाधान पाटील व जितेंद पाटील, नेरकर यांच्या विरुध गुन्हा दाखल करण्यात येवून कारवाई करण्यात यावी अशा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसल्या आहे.

LEAVE A REPLY

*