‘झिलाबाई’ लघुपट सर्वांसाठीच प्रेरणादायी : अभिनेता यशपाल शर्मा

0

जळगाव | प्रतिनिधी  :  आपल्याला ज्या कामात समाधान मिळत असेल त्याने तेच काम केले पाहिजे. हे निश्‍चित केलेले ध्येय गाठत असतांना ध्येयवेळे होवून काम करा. कारण आताच्या काळात ध्येयेवेळे कामाचे झिलाबाई या मुर्तीमंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन अभिनेता यशपाल शर्मा यांनी केले.

रोटरी वेस्टतर्फे ‘आमो आखा एक से’ या लघुपटाचा प्रिमियर शो नटवर मल्टीप्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान व्यासपिठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर लघुपटाच्या दिग्दर्शिका व अभिनेत्री प्रतिभा शर्मा, यशपाल शर्मा, महापौर नितीन लढ्ढा, अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, डिवायएसपी सचिन सांगळे, प्रतिभा शिंदे, रोटरी वेस्टचे अध्यक्ष ऍड. सुरज जहॉंगीर, मानद सचिव कृष्णकुमार वाणी, गनी मेमन यांच्यासह ८६ वर्षीय झिलाबाई उपस्थित होत्या.

पुढे बोलतांना अभिनेता शर्मा म्हणाले की, झिलाबाई यांच्या जीवनावर आधारीत ‘आमो आखा एक से’ या लघुपटाची निर्मीती केल्याने मी खुप समाधानी आहे. हिंसक चित्रपट काढणार्‍यांना अटक केली पाहिजे असे मत यशपाल शर्मा यांनी व्यक्त केले.

प्रतिभा शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की, झिलाबाई व प्रतिभा शिंदे यांना पाहुन मला लघुपट तयार करण्याची कल्पना सुचली असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगीतले. त्यानंतर झिलाबाई यांनी आदिवासी भाषेत, संवाद साधत स्वरचित गाणे सादर केले. या गाण्यावर आदिवासी महिलांनी पारंपारिक नृत्य सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. त्यानंतर लघुपट प्रदर्शित करण्यात आला.

यावेळी प्रा.शेखर सोनाळकर, मुकूंद सपकाळे, होनाजी चव्हाण, शंभू पाटील, हर्षल पाटील, शरद पांडे, पियुष रावल, रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष रमण जाजू, संदिप काबरा, विनोद बियाणी, अश्‍विन शहा, चंद्रकांत सत्रा, संगिता पाटील आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रोटरी वेस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झिलाबाई या खान्देशच्या झाशीची राणी- कुलगुरु डॉ.पाटील

आदिवासी पुर्वीपासूनच जल, जंगल, जमिन व पुर्नवसनासाठी लढा देत आहे. झिलाबाई या खान्देशमधील झाशीची राणी लक्ष्मीबाई असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच उमवीतर्फे नंदुरबारमध्ये आदिवासी कला व संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आदिवासी अकॅडमीचे भूमीपूजन करण्यात येणार असून शासनाकडून त्यासाठी पाच एकर जमीनही मिळाली असल्याचे कुलगुरु यांनी सांगितले.

अभिनेता यशपाल शर्मां यांचा युवकांसोबत संवाद- रोटरी वेस्ट तर्फे अभिनेते यशपाल शर्मा यांचा युवक-युवतींसमवेत खुला संवाद आयोजीत करण्यात आला होता. यावेळी शर्मा यांनी मराठी भाषा, साहित्य, नाटक समृद्ध असून ते वाचण्याचा सल्ला त्यांनी युवकांना दिला.

तसेच सोशल मीडियाच्या सवयीने आताची युवा पिढी दिशाहिन झाली आहे, परंतु त्या युवकांनी ध्येय निश्‍चित करुन परिश्रम केल्यास यश निश्‍चित मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान पुढे बोलतांना शर्मा म्हणाले की, मी ८० नाटकात अभिनय केला असून त्यांनी नाटक व चित्रपट यातील फरक सांगितला. त्यानंतर मनोरंजनाची साधने आल्यापासून सांस्कृतीक कार्यक्रमांना अडचणी निर्माण होत असल्याची खंत त्यांनी युवकांसमोर व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*