विद्यार्थ्यांचा एस.टी.बसच्या टपावरून प्रवास

0
तामसवाडी, ता.पारोळा | वार्ताहर :  येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी पारोळा येथे जातात. मात्र त्यांना तालुक्यावर जाण्यासाठी एस.टी.बसची अपूरी सुविधा मिळत असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास जागा मिळत नसल्याने चक्क एस.टी.च्या टपावर बसून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.

एस.टी.च्या टपावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे. त्यातच रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे टपावर बसलले विद्यार्थी तोल जावून किंवा झाडा झुडपांचा धक्का लागून जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता लोकप्रतिनिधी व एस.टी.आगार प्रमुखांनी विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल अशी एस.टी.ची चांगली सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*