जिल्हा महिला ठेवीदार समितीतर्फे धरणे आंदोलन

0

जळगाव । दि. 9 । प्रतिनिधी-ठेवीदारांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा महिला ठेवीदार समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील ठेवीदारांना 2007 पासून ठेवींच्या रक्कमा परत मिळाल्या नाहीत. अनेक ठेवीदारांच्या ठेवी अभावी मृत्यू झाला. ठेवी परत न मिळाल्याने अनेकांना आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न करता आलेले नाहीत.

सहकार विभागाने आतापर्यंत पतसंस्था चालकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यासाठी राज्य सहकारी आयुक्तांनी ऍक्शन प्लॅन आखला.

मात्र त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. कलम 88 अन्वये चेअरमन व संचालकांच्या मालमत्ता विकून त्यांच्याकडून ठेवींच्या रक्कमा वसूल कराव्यात. अनेक पतसंस्थांची कार्यालये बंद आहेत. त्यांच्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा.

पतसंस्था चालकांवर एमपीडीए अ‍ॅक्टनुसार कारवाई व्हावी, आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा महिला ठेवीदार समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी समितीच्या अध्यक्षा संध्या चित्ते, प्रवीणसिंग पाटील व ठेवीदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*