अखेर अहमद पटेल जिंकले !

0

नवी दिल्ली । दि.8 । वृत्तसंस्था-गुजरातमधून राज्यसभेवर जाण्यासाठी झालेल्या निवडणुकीने सायंकाळी नाट्यमय वळण घेतल्याने रात्री उशीरापर्यंत निवडणुकीची मतमोजणी सुरूच होऊ शकली नाही.

काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतपत्रिका भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दाखविल्याचा आरोप करून काँग्रेसने ती मते बाद करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.

काँग्रेस व भाजपच्या नेत्यांची तीन शिष्टमंडळांनी मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन भूमिका मांडली. त्यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांचे मत रद्द ठरवत मतमोजणी सुरु करण्याची परवानगी दिली.

त्यानंतर रात्री 2 वाजता या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात अमित शहा,स्मृती ईरानी या भाजपाच्या दोन उमेदवारांसह काँग्रेसच्या अहमद पटेलांना विजयी घोषीत करण्यात आले.

अहमदाबाद येथे मतमोजणी सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या वतीने क्रॉसव्होटिंग करणार्‍या दोन काँग्रेस आमदारांची मते रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

शंकरसिंह वाघेला यांच्या गोटात सामील झालेले भोलाभाई गोहिल आणि राघवजीभाई पटेल या काँग्रेस आमदारांनी आपली मते काँग्रेसच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखविल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही दाखविले.

त्यांच्या या कृतीचे व्हिडिओचित्रण झाले आहे. यात निवडणूक संचलन नियमावली, 1961 मधील नियम 39चे उल्लंघन झाल्याचा दावा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केलेल्या याचिकेत केला असून त्या व्हिडिओच्या आधारे त्या दोन आमदारांची मते रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

ही मागणी गुजरात निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला आणि आरपीएन सिंह यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

त्यांचा दाव्याला आव्हान देण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली, विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन, ऊर्जामंत्री पीयुष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान या पाच केंद्रीय मंत्र्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांची भेट घेऊन काँग्रेसचा दावा फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी केली.

काँग्रेसने हा आक्षेप आधीच का घेतला नाही, असा या प्रकरणी भाजप नेत्यांचा युक्तिवाद आहे.पाच केंद्रीय मंत्री निवडणूक आयोगात गेल्यानंतर पण त्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव घेत काँग्रेसच्या दोन आमदारांनी सरळसरळ नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची मते रद्द करण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त जोती यांना दिला. जोती यांनी हा दावा अमान्य केल्यास त्यांच्या

निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे.
क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे हे दोन्ही आमदार शंकरसिंह वाघेला यांच्या गोटातील असून त्यांची मते विरोधात जाणार हे काँग्रेसने गृहित धरले होते.

त्यामुळे निवडणूक आयोगाने ही दोन मत रद्द केल्याचे घोषीत केले.त्यानंतर 11.30 वा. मत मोजणीला प्रारंभ करण्याच्या सुचना केल्या.

परंतु निवडणूक आयोगाने सभागृहातील चित्रीकरण सार्वजनिक करण्याची मागणी करत मतमोजणीस विरोध केल्याची सुत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले. त्यामुळे रात्री 1.30 वाजेपर्यंत देखील मतमोजणी सुरु झालेली नव्हती.

 

LEAVE A REPLY

*