फाईल गहाळप्रकरणी गुन्हा दाखलची शक्यता

0
जळगाव । दि.8। प्रतिनिधी-ममुराबाद रस्त्यावरील नाला अरुंद करुन स्लॅब टाकण्यात आला आहे. याप्रकरणी तत्कालीन आयुक्तांनी स्लँब तोडण्याचे आदेश दिले आहे.
मात्र प्रशासनाकडून चालढकल केली आहे. दरम्यान मुळ ले-आऊटची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

ममुराबाद रस्त्यावरील गट नं. 507 मधील 50 फुट रुंदीचा लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह गेल्या शंभर वर्षापासून वाहत होता.

परंतु श्री.श्री. इन्फ्रास्ट्रकचर ग्रुप अ‍ॅण्ड विजय कुमार जैन व्हेंचर यांनी भराव टाकून प्रवाह बदलविला. तसेच त्यावर स्लँब टाकला असल्याची तक्रार अ‍ॅड.विजय पाटील यांनी केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने नगररचना विभागाने पाहणी करुन आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नाल्यावर स्लँब टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्लँब तोडण्याचे आदेश दिले.

 

LEAVE A REPLY

*