एलजीचा फोर-जी टॅबलेट बाजारात दाखल

0
सध्याच्या काळात मोबाईल प्रमाणेच टॅबलेटची क्रेझ देखील दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान एलजी कंपनीने वजनाने अत्यंत कमी असलेला टॅब आहे.

या टॅबमध्ये फोर जी कॉलिंग सुविधा देण्यात आली असून त्यातून व्हीडीओ कॉलिंग सुद्धा येणार आहे. हा टॅब कंपनीने बाजारात दाखल केला आहे.

एलजी कंपनीने जीपॅड ४ ८.० एफएचडी एलटीई हा टॅबलेट तयार केला असून याचे वजन हे इतर टॅबच्या तुलनेत अतिशय हलके आहे. तसेच कंपनीने सांगितल्यानुसार या टॅबमध्ये फोर-जी नेटवर्क सपोर्ट देण्यात आले आहे. तसेच इतर टॅबमधील फिचर्सचा विचार करता यामध्ये आठ इंची आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल हाय डेफिनेशनचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे या टॅबची रॅम ही २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. तसेच टॅबची रॅम ही वाढवायची असल्यास त्यात मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे हे पाच मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. तर अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे हे मॉडेल ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देखील यामध्ये प्रदान करण्यणात आली आहे.

टॅबसोबत सुमारे पाच हजार रूपयांचा प्लस पॅकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या प्लस पॅकमध्ये टॅबलेट केस, युएसबी पोर्ट, एक्सटर्नल बॅटरी पॅक हे देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*