शार्प कंपनीचे एयर प्युरिफायर बाजारात

0
शार्प कंपनीने भारतात एफपी-एफएम४०ई हे एयर प्युरिफायर बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. डास पकडण्याची सुविधा यात देण्यात आली असून शुध्द हवा यातून पुरविली जाणार आहे.

एयर प्युरिफायर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असून अनेक कंपन्यांनी याच्या उत्पादनात पदार्पण केले आहे.सध्याच्या प्रदूषित वातावरणात शुध्द हवेचा श्‍वास घेण्यासाठी एयर प्युरिफायर वापरले जात आहेत. यातच आता वायू शुध्दीकरणाच्या जोडीला अन्य फिचर्सदेखील दिले जात आहेत.

या अनुषंगाने शार्प कंपनीने एफपी-एफएम४०ई हे एयर प्युरिफायर बाजारात उपलब्ध केले आहे. यामध्ये डास पकडण्याची यंत्रणा देण्यात आली आहे.

यासाठी यात पाच स्टेप्सची प्रणाली वापरण्यात आली आहे. याच्या मदतीने डासच नव्हे तर घरातील माशांनादेखील पकडणे शक्य असल्याचा दावा शार्प कंपनीने केला आहे.

तर याच्या मदतीने हवेतील घातक कण, जिवाणू, विषाणू, जैविक कचरा, अपायकारक वायू आदींना शोषून घेत शुध्द हवा पुरविली जाते. यामुळे हवेतून होणार्‍या ऍलर्जीस अटकाव करण्यात येत असल्याने दम्यासारख्या विकारांना प्रतिबंध घालता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

शार्प एफपी-एफएम४०ई हे एयर प्युरिफायर ग्राहकांना २६ हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

*