कोविंद यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजुकर

0
जळगाव । दि.27। प्रतिनिधी-भाजपाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबत सोशल मीडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकण्यात आला आहे.
त्यामुळे संबधीतांविरुध्द कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना कोळी सामाजातर्फे दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

सोशल मीडीयावर बदनामीकारक मजुकर प्रसारीत करुन कोविंद यांची प्रतिमेबाबत जनतेत संभ्रम निर्माण केला जात असल्याने संबंधीत ग्रृप अ‍ॅडमिनवर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, आदिवासी वाल्मिकलव्य सेना जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ, मनोज सोनवणे, दौलत कोळी, चिंतामण जैतकर, रविंद्र ठाकरे, चंद्रकांत सपकाळे, निरंजन सैंदाणे, कडू सपकाळे, परशुराम साळुंखे, रतिलाल सपकाळे, प्रकाश सोनवणे, पंकज सपकाळे, अ‍ॅड. वसंत भोलाणेकर, राजु सपकाळे, लक्ष्मण तायडे, संजय पाटील, अ‍ॅड. रमाकांत सोनवणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*