विटनेर येथील चिमुकलीचे अपहरण

जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-तालुक्यातील विटनेर येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवाशीह वना बाळु भिल यांची मुलगी अनिता वना भिल (वय 12) हीचे दि.13 रोजी रात्री 8 वाजता अपहरण झाले.

तीचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळुन न आल्याने आज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये वना भिल यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास सपोनि नाना सुर्यवंशी करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*