कानळदा येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

0
जळगाव । दि.2 । प्रतिनिधी-तालुक्यातील कानळदा येथे 18 वर्षीय तरुणाचा गावाबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दरम्यान वडीलोपार्जित जमीनीच्या वादातून तरुणाचा घातपात झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
दरम्यान याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, कानळदा येथील रामचंद देवचंद सपकाळे यांचा शेतीच्या वादातून जगन्नाथ सपकाळे यांच्याशी न्यायालयात वाद सुरु आहे.

दरम्यान रामचंद्र सपकाळे यांचा नातू प्रशांत शामकिरण सपकाळे वय 19 हा मालवाहु गाडीवर चालक आहे. गावात मरीमातेची यात्रा असल्याने रात्री 8.30 वाजता त्याला फोन आला.

रात्रभर घरी न आल्याने तो ट्रीप घेवून बाहेरगावी गेला असल्याचा कुटुंबियांनी अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान आज सकाळी वामन सोनवणे यांना नांद्रा रस्त्यावरील उत्कर्षा बारजवळ असलेल्या झाडाला प्रशांतचा मृतदेह आढळून आला.

सोनवणे यांनी तात्काळ गावात येवून घटनेची माहिती दिली. कुटुंबियांनी व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान प्रथमदर्शनी प्रशांत ने आत्महत्या केल्याची निर्देशनास आले.

परंतु कुटुंबियांनी त्याचा घातपात झाला असल्याचा आरोप केला. दरम्यान गावातील नागरिकांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला.

जमीनीचा न्यायालयात वाद सुरु
प्रशांत याचे वडील नेरुळ येथे कामाला असून तो आजोबा रामचंद सपकाळे यांच्याकडे राहत होता. दरम्यान रामचंद्र सपकाळे यांच्या 50 आर जमीनीचा न्यायालयात वाद सुरु असल्याने जमीन जगन्नाथ सपकाळे यांच्या नावावर असल्याचे समजते.

जगन्नाथ सपकाळे व त्यांचा मुलगा सुधीर सपकाळे यांनी यापूर्वी प्रशांतसह आजोबा रामचंद्र आजी खताबाई यांना घरात येवून दोनदा मारहाण केली होती.

याबाबत रामचंद्र सपकाळे यांनी तालुका पोलिसात व पोलिस अधिक्षक यांच्याकउे तक्रार अर्ज देखील दिला होता. परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचाही आरोपी रामचंद्र सपकाळे यांनी केला.

दरम्यान मयत प्रशांत याच्या छातीवर व चेहर्‍यावर किरकोळ खरचटलेले असल्याने व त्याच्या अंगाला धुळ लागलेली असल्याने त्याचा घातपात झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

दरम्यान तालुका पोलिस याप्रकरणी तपास करीत असून प्राथमिक तपासानुसार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

 

LEAVE A REPLY

*