शहरात 30 तासानंतर पाणीपुरवठा सुरळीत

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-एमआयडीसी परिसरात रेमण्ड चौफुली ते पोलीस स्टेशन या दरम्यान जलवाहिनीची गळती झाली होती. गळती दुरुस्ती करण्यासाठी शहरातील एक दिवस पाणीपुरवठा विसकळीत करण्यात आला होता. दरम्यान, गळती दुरुस्ती झाल्यानंतर चाचणी घेवून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
एमआयडीसी परिसरात 1500 मिमी व्यासाची जलवाहिनीची गेल्या काही दिवसांपासून गळती सुरु होती. गळती दुरुस्ती केल्यानंतरही वारंवार गळती होत होती.

रेमण्ड चौफुली आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर जलवाहिनीची गळती झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

दरम्यान, दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा विसकळीत करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गळती शोधल्यानंतर सात ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली.

तब्बल 30 तासानंतर आता पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. उद्या दि.4 रोजी नियोजीत भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

आज या भागात होईल पाणीपुरवठा
खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर, सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी.

उद्या या भागात होईल पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नविपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी.

रविवारी या भागात होईल पाणीपुरवठा
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड, रामेश्वर कॉलनी, एम.डी.एस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, शांतिनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहननगर, नेहरुनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रोपदी नगर, मूक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगांव परिसर, तांबापूरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्लब या भागात पाणीपुरवठा होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*