19 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरु करण्याचे आदेश

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-तालुक्यातील सावखेडा बुदु्रक ग्राम पंचायत हद्दीत येणार्‍या वाघनगर परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी 19 कोटी 26 लाख 60 हजार रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या 20 दिवसांत या कामास सुरवात करण्याचे आदेश राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले आहेत.
आज अजिंठा शासकिय विश्रामगृहात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात आली.

यावेळी जि.प. सदस्य पवन सोनवणे, पं.स. सदस्य तुषार महाजन, नंदू पाटील, मजिप्राचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, तहसिलदार अमोल निकम, प्रविण पाटील, भगवान पाटील, भोेजू महाजन, खेमचंद महाजन, संजय ढाके व संतोष पाटील सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता जी. टी. राजपूत, एस. आर. राऊत मनपाचे डी. एस. खडके, उमाळा रायपूर कंडारी या गावांचे ग्रामसेवक सरपचं, ग्रा.पं.सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

वाघनगर भागातील सततच्या पाणी टंचाईबाबत परिसरातील नागरिकांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे समस्या मांडली होती.

या समस्येची तात्काळ दखल घेवून राज्यमंत्री पाटील यांनी शासनदरबारी जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत दि.17 फेबु्रवारी 2017 रोजी पाणी पुरवठा योजनेला प्रशासकिय मान्यता मिळवून घेतली.

त्यानुसार शासनाने 19 कोटी 26 लाख 60 हजार रुपये पाणी पुरवठा योजना मंजुर केली होती. या कामास येत्या 20 दिवसांत सुरुवात करण्याचे आदेश ना.पाटील यांनी दिले.

या कामाअंतर्गत 1 लाख लीटर पाणी साठा क्षमतेच्या 2 टाक्या तर साडेतीन लाख लीटर पाणी क्षमतेची 1 टाकी बांधण्यात येणार आहे.

तसेच कोल्हे हिल्सवर जलशुध्दीकरण केंद्र, वाघूर धरणावरुन पाईपलाईन आणणे आदी कामांचा समावेश आहे. पाणी आरक्षण, वनक्षेत्रातून टाकण्यात येणारी पाईपलाईन, कंडारी व उमाळे ग्रामपंचयातचे ठराव, मनपा जागेवर टाकीच्या बांधकामासाठी महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चर्चा करुन मनपा जागेवर बांधण्यात येणार्‍या जलशुध्दीकरण केंद्रासाठी भाडे न आकारता ती जागा विनामुल्य देण्याचे सांगितले. यावर महापौरांनी आम्ही तसा ठराव करु, असे आश्वासन दिले.

 

LEAVE A REPLY

*