शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा

0
जळगाव । दि.2 । प्रतिनिधी -एमआयडीसी पोलिस स्टेशनसमोरील वाघुर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहीनीस गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीचे काम आज सुरु आहे. त्यामुळे उद्या दि.3 रोजी शहरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहीती पाणीपुरवठा विभागाने दिली.
गेल्या काही दिवसांपासून पोलिस स्टेशनसमोरील 1500 मीमी व्यासाच्या जलवाहीनीस गळती लागली आहे. गळतीचे काम हाती घेण्यात आले.

दुरुस्तीचे कामासाठी 30 तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा पाणीपुरवठा बंद ठेवून पाण्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे.

उद्या दि.3 रोजी होणारा पाणीपुरवठा दि.4 रोजी शुक्रवारी तर दि.4 रोजी होणारा पाणीपुरवठा शनिवारी तसेच दि.5 रोजी होणारा पाणीपुरवठा रविवारी होणार असल्याची माहीती पाणीपुरवठा अभियंता सुनिल भोळे यांनी दिली आहे.

शुक्रवारी या भागात होईल पाणीपुरवठा
खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर, सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*