पालकांनी विद्यार्थ्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य द्यावे – जिल्हाधिकारी

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चित करणे आवश्यक आहे वेळेचे व्यवस्थापन करुन एकाग्रता बाळगावी, एकांतात स्वयंअध्ययन करावे,पालकांनी विद्यार्थ्यांना निर्णय स्वातंत्र्य द्यावे असे मत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व नुतनीकरण केलेल्या आयएमए सभागृहाचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला.

यावेळी ते बोलत होते. डॉ.जे.जी.पंडीत आयएमए हाऊस मध्ये झालेल्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी खा.डॉ.उल्हास पाटील आणि अध्यक्ष डॉ.विश्वेश अग्रवाल, सचिव डॉ.राजेश पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

आयएमए जळगावचे प्रथमच विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केल्या बद्दल व नूतनीकरण केलेल्या वातानुकलीत सभागृहाबद्दल माजी. खा. डॉ.उल्हास पाटील यांनी अभिनंदन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना निरंतर सरावातुनच यश प्राप्त होते.

विद्यार्थी गौरव सोहळा इतरांसाठी प्रेरणादायी असतात असे प्रतिपादन केले. याप्रसंगी आयुषी पायघन, विराज मुळीक, आदित्य देशमुख, आश्विन गाजरे, ईशा पिपरिया, अपूर्व सरोदे, किर्ती महाजन, आदित्य उपाध्ये, सारस किनगे, आदित जैन, निहारिका भिरुड, मधुरा उभाड पाटील, सुनील पाटील, शिवानी दातार, उत्कर्ष भालोदे, जान्हवी पाटील, आर्यन महाजन, स्वराज पाटील, विराज पाटील, आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आर्किटेक्ट सुचेता कोल्हे व डॉ.जितेंद्र कोल्हे यांचा सभागृहाच्या नुतनीकरणाबद्दल गौरव करण्यात आला. डॉ.पंकज पाटील, डॉ.राजेश डाबी, डॉ.सुनिल गाजरे, डॉ.शिवराज मुळीक, डॉ.नंदन माहेश्वरी यांचा देणगीदार म्हणून सत्कार करण्यात आला.

आयुषी पायधन, सारस किनगे, आदित जैन या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.रेणूका चव्हाण व लीना पाटील यांनी केले. आभार डॉ.राजेश पाटील यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*