आयुक्त जीवन सोनवणे यांचा सेवापुर्ती सन्मान

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-शासकीय तंत्रनिकेतन माजी संघटना व गोदावरी फाऊंडेशन संचलित अभियांत्रिकीतर्फे मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांचा सपत्नीक सेवापुर्ती सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा डॉ उल्हास पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
यानंतर डॉ.जानकीराम तळेले व माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी आयुक्त जगन सोनवणे यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देउन सत्कार केला.

यावेळी बोदवडचे तहसिलदार भाउसाहेब थोरात, आयुक्ताचे मोठे भाऊ निवृत्त वनअधिकारी उदय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देतांना आयुक्त सोनवणे यांनी त्यांच्या आयुष्यातील हा सुवर्णक्षण असून जून्या मित्रांनी केलेला सत्कार प्रेरणादायी असल्याचे सांगत अनुभव कथन केले.

माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी आयुक्त सोनवणे हे आपला मित्र असल्याचा गर्व आहे असे सांगीतले. प्रास्ताविक सिद्धार्थ नेरकर यांनी केले.

सुत्रसंचालन प्राचार्य डॉ. अशोक पी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला जळगाव परिसरातील विविध पदावरी कार्यरत असलेले शासकिय तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी सहपरिवार उपस्थीत होते.

यशस्वीतेसाठी गोदावरी इस्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्चचे डॉ.प्रशांत वारके, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.व्ही. जी. अरजपूरे, उपप्राचार्य प्रविण फालक यांनी परिश्रम घेतेले.

 

 

LEAVE A REPLY

*