जळगावच्या भंगार बाजार व ऑटो नगरातून चोरीची वाहने तोडफोड आधीच पोलिसांच्या ताब्यात

0
जळगाव | प्रतिनिधी : येथील भंगार बाजार व ऑटो नगरात धुळे, मालेगाव येथून चोरून आणलेल्या १३ मोटारसायकली, ७ ट्रक व १ लक्झरी बस तोडफोड होण्याआधीच पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आली आहेत.

धुळे, मालेगाव व इंदौर येथून सुमारे १३ मोटारसायकली, ७ ट्रक व एक लक्झरी बस अशी एकूण २१ वाहने जळगावच्या भंगार बाजारात व ऑटो नगरात तोडफोडीसाठी दाखल झाले होते.

मात्र याची माहिती पोलिस अधिक्षकांच्या पथकाला मिळताच त्यांनी या दोन्ही ठिकाणी छापे टाकून सदरची चारेची वाहने जप्त करून ताब्यात घेतली आहेत.

ही वाहने नेमकी कोणाची याचा शोध पोलिस घेत आहे.

LEAVE A REPLY

*