देविदास कॉलनीमध्ये घरात आढळला मृतदेह

0
जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-कुजलेल्या स्थितीत देवदास कॉलनीतील प्रौढाचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उग्र वास येत असल्याने शेजारच्यांनी बघीतल्यावर घटना उघडकीस आली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिपक श्रीहरीसा भारोटे (वय 49) हे देविदास कॉलनीत एकटेच राहतात. त्यांना दारूचे व्यसन जडले होते. यामुळे पत्नी योगिता भारोटे ह्या वेगळ्या राहत होत्या.

दरम्यान, मंगळवारी सकाळी भारोटे यांच्या घरातून उग्र वास येत होता. त्यामूळे शेजारी राहत असलेले संचेती कुटूंबियांनी दार ठोठावून दिपक भारोटे यांना आवाज दिला.

मात्र घरातुन कोणताही प्रतिसाद न आल्याने संचेती यांनी योगिता भारोटे यांना संपर्क साधुन घडलेला प्रकार सांगितला. योगिता भारोटे हे भाऊ सौरभ यांना कळवून दोघांना देविदास कॉलनी गाठत घराचे दार उघडले.

त्यांना घरात कुजलेल्या स्थितीत दिपक भारोटे हे मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

 

LEAVE A REPLY

*