जळगावात सट्टा, जुगार अड्ड्यावर धाडसत्र

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-शहरातील आकाशवाणी चौकात जुगार खेळणार्‍या चौघांवर तसेच गुजराल पेट्रोलपंपाजवळील दारु दुकानाशेजारील सट्टाच्या अड्डयावर प्रशिक्षणार्थी डीवायएसपी धनंजय पाटील यांच्या पथकाने धाड टाकली आहे.
आकाशवाणी चौकात जुगार खेळणार्‍या चौघांवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करून 700 रुपयांच्या रक्कमेसह 3 रिक्षा, 3 मोबाईल असा 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डीवायएसपी सचिन सांगळे रात्री पेट्रोलिंगला असतांना त्यांना आकाशवाणी चौकातील रिक्षा स्टॉपजवळ रिक्षात रिक्षाचालक जुगार खेळतांना दिसून आले.

डीवायएसपी सांगळे यांनी याबबत जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पीएसआय गजानन राठोड, शेखर पाटील, तुषार जावरे, डाईव्हर सोनार यांनी तात्काळ आकाशवाणी चौकात जावून पहाटे 3.45 वाजता जुगार खेळणार्‍या नितीन शिरसाळे रा. जाकीर हुसेन कॉलनी, रुपराज देवरे रा. वाघ नगर, योगेश वाघ रा. रामेश्वर कॉलनी, अय्युब खॉ सरदार खॉ पठाण रा. गेंदालाला मिल या चौघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 700 रुपये रोख 3 रिक्षा, 3 मोबाईल असा 1 लाख 60 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द पो कॉ. शेखर पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ. पुरुषोत्तम वागळे करीत आहे.

गुजराल पेट्रोलपंपाजवळील सट्टयाच्या अड्ड्यावर धाड
प्रशिक्षणार्थी डीवायएसपी धनंजय पाटील यांच्या भरारी पथकाला गुजराल पेट्रोलपंपाजवळ असलेल्या दारु अड्डयाच्या शेजारील टपरीमध्ये सट्टा सुरु असल्याची माहिती मिळाली.

आज दुपारी प्रशिक्षणार्थी डिवायएसपी यांनी या ठिकाणी धाड टाकून दिलीप भोसले, दिलीप नाथाणी, सुनिल चांदवाणी, संतोश सोनवणे या चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 19 हजार 680 रुपये रोख, मोटारसायकल व मोबाईल असा जवळपास 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चौघांविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

इस्लामपुर्‍यात सट्टा खेळविणार्‍यास अटक
शनिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील इस्लामपुर्‍यात सट्टा खेळणार्‍या व खेळविणार्‍या भिमराव सुकदेव वानखेडे रा. नवीन रायपूर याला शनिपेठ पोलिस स्टेशनचे मोतीलाल पाटील व मिलिंद कंक यांनी ताब्यात घेतले असून त्याच्याजवळून 620 रुपये रोख मिळून आले आहे.

 

LEAVE A REPLY

*