कॅशलेससाठी लोकसहभाग वाढवा – निंबाळकर

0
जळगाव । दि.21। प्रतिनिधी-डिजीटल इंडीया कार्यक्रमांतून ‘इ-पेमेंट’ पध्दतीची संकल्पना पुढे आली असून ती आता सर्वत्र लोकमान्य व लोकप्रिय होत आहे.
दरम्यान, कॅशलेस व्यवहारात जिल्हा अग्रस्थानी आणण्यासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले.
जिल्हापुरवठा विभागातर्फे लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत ‘इ-पॉज’ मशीनचे प्रशिक्षण वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, पुरवठा विभागाचे विलास हरीमकर, पुरवठा तपासणी अधिकारी दिपक कुसकर,पुरवठा अव्वल कारकुन योगेश नन्नवरे, पुरवठा हिशोब अवल कारकून श्री.उगले, पुरवठा निरीक्षक श्री. जाधव, ओयासीस कंपनीचे महाव्यवस्थापक जी रामलिंगा रेड्डी, प्रशिक्षक राजेंद्र नजर भागवाले, जळगावचे तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, सर्वांकडे मोबाईल फोन असून ते त्याचा वापर करीत आहे.

मोबाईल फोन ही आपली ओळख बनली आहे. कॅशलेश व्यवहार ही काळाची गरज असून ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.

पॉज मशीनचा वापर कसा करावयाचा याचे प्रशिक्षणासह मार्गदर्शक पुस्तीका दिली आहे. प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी एकूण 1900 मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

दि.24 जूनपर्यंत मशीन वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटीया यांनी केले.

सहा तालुक्यांना वाटप
आज धरणगाव एरंडोल, चोपडा, यावल, जळगाव आणि अमळनेर या सहा तालुक्यांना मशिन वाटप करण्यात आले. उद्या दि.22 रोजी भुसावळ, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर, दि.23 रोजी जामनेर, पाचोरा दि.24 रोजी पारोळा, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यांना मशिन वितरीत करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*