जळगावात बेवारस बॅग आढळल्यामुळे खळबळ

0
जळगाव । दि.29। प्रतिनिधी-शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परीसरात आज सायंकाळी बेवारस बॅग आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती.
शहारातील खान्देश सेंट्रल मॉल परीसरात आज सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास एक काळ्या रंगाची बेवारस बॅग पडलेली दिसुन आली.

या परीसरात उभ्या असलेल्या नागरीकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी शहर पोलीसांना कळविले. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

बॅग आढळून आलेल्या परीसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी श्वान आणि बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. यावेळी शहरातील नागरीकांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे खान्देश सेंट्रल मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार बंद केले.

बॉम्ब शोधक पथकाकडुन तपासणी
खान्देश सेंट्रल मॉल परीसरात आढळुन आलेल्या या बेवारस बॅगची बॉम्ब शोधक पथकाकडुन कसुन तपासणी करण्यात आली. तसेच श्वानपथकाकडुनही तपासणी झाल्यानंतर बॅगमध्ये कुठलेही स्फोटक सापडुन आले नसल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास घेतला.

बॅगमध्ये निघाले कपडे
बॅगची तपासणी झाल्यानंतर ही बॅग उघडली असता त्यात कपडे आढळुन आले. मात्र ही बॅग कुणाची व याठिकाणी आली कशी? याबाबत उपस्थितांमध्ये तर्कवितर्क सुरू होते. दरम्यान पोलीसांनी ही बॅग ताब्यात घेतली असुन बॅगशी संबंधीत व्यक्तीचा शोध सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

*