हेयरडाय

0

बाजारात असंख्य प्रकारची केश सौंदर्य प्रसाधने विविध प्रकारची आश्वासने देत स्वरुपात उपलब्ध आहेत. ही आश्वासने तात्पुरत्या स्वरुपात फायदा देतात.

पण केसांची काळजी घेणार्‍यांनी कायम स्वरुपात फायदा देऊ शकणारे वैद्यकीय सौंदर्य उपचार घ्यावेत. केसांना सौंदर्य प्रसाधने लावल्यामुळे केस सुंदर दिसतात पण केस निरोगी होतात असे समजू नये.

त्वचेवर केसांचे मुळाशी लावून केस वाढवण्यास प्रोत्साहन देणारी विज्ञानाने सिद्ध केलेली औषधे फार कमी प्रकारची आहेत ती डॉक्टरांचे सल्ल्याने वापरावीत.

आपल्या शरीरावरील केस रोज काही मीटर लांबीने वाढतात त्यासाठी जेवणातून त्यांना पुरेशा प्रमाणात प्रथिनांची व जीवनसत्वांची गरज रोज असते.

डॉ प्रमोद महाजन

डोक्यावरील आवश्यक केस रोगट झाल्यास ते कमी प्रमाणात वाढतात. हार्मोन्सच्या प्रभावामुळे डोके सोडून बर्‍याच भागावरील केस पातळ असल्यामुळे ते सहज निरोगी रहातात. ते वाढत्या वयानुसार उलट बळकट होताना दिसतात.

अ‍ॅनाजन या स्थितीमध्ये केस 800 दिवस वाढते नंतर कॅटाजन व टेलोजन या स्थितीत रुपांतरीत होऊन कमकुवत होत जाते व गळून पडते.

पुन्हा या ठिकाणी नवीन केस येतात. या स्थितीला अंदाजे 200 दिवस लागतात. जर केस परत आले नाहीत तर आपण केस कमी झाले अथवा टक्कल पडले असे म्हणतो.

केसांच्या या स्थितीजन्य वाढीमुळे केसांवर उपचार घेण्याचा चांगला फायदा जाणविण्यासाठी वैद्यकीय सौंदर्य उपचार कमीत कमी 4 ते 6 महिन्यापर्यंत घेणे गरजेचे असते. केसांना सातत्याने निरोगी ठेवण्यासाठी गरजेनुसार हे उपचार मधून मधून काहींना घेण्याची गरज असते.

पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी अथवा तरुण दिसण्यासाठी प्रगत जगातील 70% स्त्रिया केसांवर रंगाचा प्रयोग करतात. केसांना रंग देणारी सौंदर्य प्रसाधने केसांचे आरोग्य बिघडवण्याची शक्यता बरीच असते.

म्हणून जे लोक वारंवार हेअरडाय वापरतात त्यांना केसांचीं निगा घेण्याची गरज जास्त प्रमाणात असते. डॉक्टरांचा सल्ला न घेता अथवा केसांची स्थिती तपासून न घेता केसांचे सौंदर्य वाढवणारी सौंदर्य प्रसाधने वापरणे व केसांचे आरोग्य सुधारणारे उपचार टाळणे कालांतराने घातक ठरण्याची शक्यता असते.

केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व केशसंभार वाढत्या वयातही चांगला राहण्यासाठी जेवणात पुरेशा प्रमाणात हिरव्या पालेभाज्या, फळे व मोड आलेली कडधान्ये 250 ग्रॅम एवढ्या प्रमाणात रोज सेवन करावेत.

रसायने टाकलेले पदार्थ कमीत कमी प्रमाणात खावे. तळलेले पदार्थ, मिठाई, बेकरीचे पदार्थ, बाजारातील तयार चविष्ट पदार्थ टाळावे. त्यांचेमधील रसायने आरोग्याला व केसांना घातक असतात.

तणावपूर्वक जीवनशैली, जागरण, अतिनियमितता, अपूर्ण झोप, अपूर्ण विश्रांती काही रोगांवर दिली जाणारी औषधे केसांचे आरोग्याला घातक ठरतात.

आकर्षक दिसण्यासाठी त्यांचेवर केलेली प्रक्रिया केसांना कमकुवत करते. उदा. केस स्ट्रेटनिंग, कलिंग, कलरिंग.

 

LEAVE A REPLY

*