मुक्ती मणकेदुखीपासून

0
तरु ऊ ही कंबर आणि मानदुखीसाठी, विना ऑपरेशनची जगातली सर्वोत्तम उपचार पद्धती ठरली आहे. मणक्याच्या विविध आजारांमुळे जसे स्पॉन्डीलायटीस, स्लीपडिस्क, सायटिका वा इतर कारणांमुळे स्नायू, शिरा वा लीगामेंट यांच्यावर येणारा दाब कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
प्रश्न जेव्हा तुमचा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचा असतो तेव्हा उपचाराची पूर्ण माहिती करून घेणे तुमच्या हिताचे असते. किंबहुना तो तुमचा अधिकारच असतो.

ही उपचार पद्धती कशी काम करते?
ही कंबर आणि मानदुखीसाठी विना शस्त्रक्रिया अशी जगातील सर्वोत्तम पद्धती ठरली आहे. असहाय करणारी कंबर आणि मानदुखी, सायटिका, यावरील उपचारात हा महत्त्वाचा शोध मानला जातो.

डॉ शैलेंद्र पाटील

हे पेटंटेड तंत्रज्ञान, मेरुदंडाला (डळिपश) ला हळुवारपणे ताण देते, ज्यामुळे शिरांवरील दाब कमी होतो व मणक्यातील चकत्या (ऊळील) जागेवर येतात.

आपल्या दैनंदिन कामात कंबरेच्या मणक्यांमध्ये दाब तयार होतो. हाच दाब या उपचाराने खाली आणता येतो. याचा फायदा असा होतो की चकतीचा बाहेर आलेला भाग परत मूळ जागेवर परत जातो व अन्नद्रव्य हे चकतीमध्ये पोहोचायला सुरुवात होेते.

परिणामी तेथील सूज कमी होऊन शिरांवरील दाब निघून जातो व वेदना कमी होत होत बंद होतात. म्हणजेच आपल्या शरीरात झालेल्या जखमा भरून येण्यास तअद ऊ मदत करते आणि तेही पूर्णपणे नैसर्गिकरित्या व कुठल्याही धोक्याशिवाय!ही सुरक्षित उपचार पद्धती आहे.

जी केवळ तुमचे दुखणेच बरे करते असे नाही तर त्या दुखण्याचे समूळ उच्चाटनही करते. यासाठी पोशाख बदलण्याची गरज नाही. पेशंटच्या कंबरेला/मानेला पट्टे बांधले जातात व त्या नंतर पेशंटला टेबलवर पालथे/उताणे झोपवतात ह्या टेबलची कार्यप्रणाली पूर्णपणे कॉम्प्युटर कंट्रोल करतो. साधारणत: 30/45 मिनिटे ही प्रक्रिया चालते. बर्‍याच पेशंटला आरामदायी वाटल्यामुळे झोपही लागते.

स्लीप डिस्कचा त्रास जातो काय?
खरेतर आपल्या जागेपासून डिस्कचा काही भाग बाहेर येतो त्याला आपण स्लीप डिस्क म्हणतो. या उपचाराने 90% पेशंटचा स्लीप डिस्कचा त्रास यशस्वीपणे घालवला आहे.

ज्यांना एकापेक्षा जास्त स्लीप डिस्क आहे. त्यांनापण या उपचार पद्धतीने फायदा होऊ शकतो. ऑपरेशनने एकापेक्षा अधिक स्लीप डिस्क काढणे गुंतागुंतीचे ठरू शकते. अशा रुग्णांमध्ये व्हॅक्स डी खूपच उपयोगी ठरते.

 

 

 

LEAVE A REPLY

*