आरोग्यदूत : व्हॅक्स डी

0

माझे स्लीप डिस्कसाठी ऑपरेशन झाले आहे तरी व्हॅक्स डी उपचार घेता येतील का?

होय, हाच व्हॅक्स डी चा फायदा आहे. मणक्याच्या ऑपरेशनमध्ये जर स्क्रू/पट्टी लावलेली नसेल तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात.

संशोधनात सिद्ध झाले आहे की एकापेक्षा जास्त वेळा मणक्याचे ऑपरेशन झाले असेल त्यांनाही व्हॅक्स डी चा फायदा झाला आहे.

डॉ शैलेंद्र पाटील

व्हॅक्स डीचे उपचार कसे असता? किती सत्रात फरक जाणवतो?
हे उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही. बाह्य रुग्ण विभागात उपचार घेऊन घरी जाता येते. साधारण 30/40 मिनिटे एका सत्राला लागतात.

त्याचबरोबर 15/20 मिनिटांचे स्नायूंचे इलेक्ट्रिकॅल स्टीम्युलेशन असे 45/60 मिनिटांचे एक सत्र होते. पेशंटच्या कंबरेला/मानेला पट्टे बांधले जातात व त्यानंतर पेशंटला टेबलवर पालथे/उताणे झोपवतात. ह्या टेबलची कार्यप्रणाली पूर्णपणे कॉम्प्युटर कंट्रोल करतो.

आजाराचे कारण, त्याची तीव्रता, पेशंटची शारीरिक व मानसिक स्थिती यावर किती सत्रात फरक जाणवेल याचा कालावधी अवलंबून असतो.

साधारणपणे दररोज 1 ते 2 सत्र याप्रमाणे 20 सत्रांची हे थेरपी असते काही पेशंटला जास्त सत्रांची गरज लागते व ते वरील गोष्टीवर ठरते.

पेशंटच शारीरिक व मानसिक स्थितीनुसार वेदना कमी होण्यास कमी जास्त वेळ लागतो. बहुतेक सर्व पेशंटला पहिल्या काही सत्रातच फरक दिसतो.

गेली 30 वर्षे व्हॅक्स डी थेरपी वापरताना आलेल्या अनुभवातून असे दिसते की व्हॅक्स डी ने एकदा बरे झाले की दीर्घकाळ ते वेदनारहित आयुष्य जगतात.

तथापि काही पेशंटची जीवनशैली व कार्यप्रणाली अशी असते की त्यांना कंबर दुखीचा धोका सतत असतो. या प्रकारच्या पेशंटला व्हॅक्स डीची महिन्यातून 1/2 सत्र उपचार घेणे हितावह असते.

एकदा बंद झालेली मणकेदुखी कायम दूर ठेवण्याची त्रिसूत्री
1) नियमित व योग्य व्यायाम. 2) आहार विहाराच्या योग्य सवयी. 3) काम करण्याच्या पद्धतीत योग्य बदल.

LEAVE A REPLY

*