जयपूर : कामाचे तास संपल्याने वैमानिकाचा उड्डाणास नकार

0

वैमानिकाने कामाचे तास संपले म्हणून विमानाचे उड्डाण रद्द करून प्रवाशांना बसने पाठवल्याची घटना जयपूरमध्ये घडली.

जयपूर – दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होते. मात्र वैमानिकाने आपले कामाचे तास संपले असून, उड्डाण करणार नाही असे सांगितल्याने विमान उड्डाणच करु शकले नाही.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आले. उर्वरित प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा करण्यात आली होती. त्यांना सकाळी दुस-या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.

‘वैमानिकाचे कामाचे तास संपले असल्या कारणाने तो उड्डाण करु शकत नव्हता’, अशी माहिती जयपूरमधील संगनेर विमानतळाचे संचालक जे एस बल्हारा यांनी दिली आहे.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकत नाहीत.

LEAVE A REPLY

*