एक हजार बस गाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’

0
नाशिक : एसटी महामंडळाची छाप असलेले आणि बी्रद वाक्य असलेल्या बोधचिन्हाखाली ‘जय महाराष्ट्र’ हा राज्याचा जयघोष असलेले वाक्य जिल्ह्यातील 16 आगारातील 1 हजार बसवर महामंडळाने लिहले आहे.

सिमावर्ती भाग असलेल्या बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणण्यास प्रतिबंध घालण्याचा कर्नाटक शासनाच्या निर्णयाला टोला म्हणून महाराष्ट्र शासनाने बेळगावला जाणार्‍या प्रत्येक एसटी बसवर जय महाराष्ट्र लिहून गाड्या त्या राज्यात रवाना करण्याचा निर्णय घेतलेला होता.

या निर्णयाची अंमलबजावणी परराज्यात पाठवण्यात येणार्‍या एसटीबससह राज्यातंर्गत प्रवाशी सेवा देणार्‍या महामंडळाच्या सुमारे 14 हजार गाड्यांवरही एसटीच्या लोगो खाली जयमहाराष्ट्र लिहण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता. त्यानुसार प्रत्येक गाडीवर जय महाराष्ट्र लिहण्यासाठी एसटीच्या कर्मशाळांमध्ये पेंटींग विभागाला सूचीत करण्यात आलेले होते.

नाशिक विभागात 17 डेपोंमध्ये एसटीच्या सुमारे 1100 गाड्या कार्यान्वित आहे. या गाड्यावर जय महाराष्ट्र लिहण्याचे काम गत काही दिवसांपासून सुरु होते. आज अखेरपर्यंत सुमार 1 हजार गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहण्यात आले, असे डेपो क्रमांक 1 मधील कार्यशाळा प्रमुख बी.पी. हिरे यांनी माहिती देताना सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*