#ITMovie : ‘इट’सिनेमाने ३ दिवसांत कमावले ११५० कोटी

0

८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडच्या भयपट ‘इट’ने अमेरिकेत अवघ्या तीन दिवसांत सुमारे ११.७२ कोटी डॉलर्सची कमाई केली आहे.

आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व भयपटांचा रेकॉर्ड या सिनेमाने मोडला आहे.

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भयपटांमध्ये ‘इट’ हा अव्वल ठरला आहे.

याआधी भयपटांमध्ये ‘पॅरानॉमल अॅक्टिव्हिटी ३’ या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली होती. याशिवाय सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळालेला सिनेमा म्हणूनही ‘इट’कडे पाहिले जात आहे.

याआधी २०११ मध्ये ‘पॅरानॉमल अॅक्टिव्हिटी ३’ सिनेमाने पहिल्या दिवशी ५.२६ कोटी डॉलर्सची कमाई केली होती. विशेष म्हणजे या सिनेमाला भारतीय प्रेक्षकांचीही पसंती मिळाली आहे.

या सिनेमाची निर्मिती दोन भागांमध्ये करण्यात आली असून त्याचा दुसरा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*