कॅन्सर असतांनाही दहावीत इशिताने मिळवले तब्बल 90 टक्के; हाताची सर्जरी होवूनही रायटर न घेता लिहले पेपर

0

 

नाशिक : ईच्छाशक्ती दुर्देम्य असेल तर काय चमत्कार होवू शकतो याचे मूर्तिमं उदाहरण म्हणजे नाशिकच्या ईशिता भंडारीचे देता येईल.

हाडाचा कॅन्सर असतांनाही केमेथेरेपीसारखे वेदना देणारे उपचार सहन करत तीने संपूर्ण दहावीच्या वर्षात अभ्यास केला. आयसीएसई बोर्डाचा निकाल सोमावारी लागला त्यात ईशिता तब्बल 90 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली.

इतरांनाही प्रेरणा देईल असा ईशिताचा दहावीचा प्रवास आहे. विस्डम हाय शाळेत शिकणारया ईशिताला 2016 सालच्या मार्चमध्ये हाडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबईच्या हिंदूजा रूग्णालयात तिचा उपचार सुरू झाला. दहावीचे महत्वाचे वर्ष त्यात अभ्यास, केमोथेरेपीसाठी सारख्या कराव्या लागणारया मुंबईवारया यात तिने आपले मनोधैर्य अजिबात खचू दिले नाही.

जमेल तसा मिळेल त्या वेळेत तिने अभ्यास सुरू ठेवला. रोज काही वेळ अभ्यासाला तिने दिला. डॉक्टरांनी प्रवासाला मनाई केल्याने तिला घरीच टयूशन देण्याचा निर्णय तिचे पालक नितीन भंडारी व अजोबा सुभाष भंडारी यांनी घेतला. त्यानुसार धीरज सर यांची टयूशन तिला लावली. त्यात तिचा अभ्यास काही प्रमाणात झाला.

तिच्या या अडचणीच्या कालावधीत विस्डम हायचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही तिला मोलाची साथ दिली. तिचा हुरूप वाढावा, सकारात्मक उर्जा यावी यासाठी तिला वेळेावेळी प्रोत्साहन दिले. या सर्व अडचणींचा सामना करत ईशिताने दहावीची परिक्षा दिली ते देखील कोणत्याही प्रकारचा रायटर न घेता. तिच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया झालेली असल्याने तिने रायटर घ्यावा अशी सूचना शाळेने तसेच आयसीएससी बोर्डाने दिलेली असतांनाही तिने स्वत: सगळे पेपर लिहीले.

सोमवारी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात ईशिताला तब्बल90 टक्के मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. ईशिताला पुढे कॉमर्समध्ये शिक्षण घ्यावयाचे असून त्यानंतर ती पुढे मॅनेजमेंट करणार आहे. डिझाईनिंगमध्ये पुढे तिला करीयर करण्याची ईच्छा आहे.

LEAVE A REPLY

*