नाशिकमधला वैशिष्ट्यपूर्ण इराणी चहा

0

देशदूत डिजिटल विशेष

पुण्या-मुंबईत इराण्याकडचा चहा प्यायल्याचा आणि ज्यूक बॉक्समधले आवडीचे गाणे ऐकल्याचा अनुभव अनेक बुजूर्ग शेअर करताना दिसतील.

येथील काही इराणी उपाहारगृह आजही प्रसिद्ध आहेत.

इराणी हॉटेल म्हटले की चहा आणि बन मस्का हा हमखास मिळणारा पदार्थ. चहाच्या अस्सल चाहत्यांना हा प्रकार खूळावून टाकतो.

नाशिकमध्ये मिसळ आणि चिवडा अशी खाद्य संस्कृती रुजत असतानाच चहाची संस्कृतीही रुजत गेली. इराणी चहा हा त्यापैकीच एक.

जुन्या नाशिकमध्ये हाजी दरबार येथे खास इराणी पद्धतीचा चहा मिळतो. कुकरसारख्या दिसणाऱ्या एका बंद भांड्यात वाफ कोंडून थोडाचा आंबूस चवीचा हा चहा तयार होतो.

त्याचे वैशिष्टय असे, की मलाई टाकूनच हा चहा आपल्या पुढ्यात येतो. अर्थात हाजी दरबार उपहारगृहाची रचना काही इराणी हॉटेलसारखी नाही.

आता तर जुन्या नाशिकमध्येच नव्हे, तर इतरही असा चहा मिळू लागला आहे. अलिकडेच आकाराला आलेले टी एन टोस्ट हे त्यापैकी एक आधुनिक चहापानगृह.

नाशिक रोड आणि वडाळा रोडला जोडणाऱ्या अशोका मार्गावर हे छोटेखानी उपाहारगृह आहे.

अस्सल इराणी चहा इथे दहा रुपयांत मिळतो. सोबत २० रुपये अधिक देऊन बन मस्का खाता येतो.  याशिवाय चहाचे इतरही प्रकार इथे उपलब्ध आहेत.

इम्रान काझी नावचे एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत गृहस्थ या उपाहारगृहाचे मालक आहेत. खरे तर चहाच्या टपरीचाच हा विस्तारित प्रकार म्हणता येईल.

नाशिककर चहाबाजांना आता या निमित्ताने आणखी एक चहाचे दुकान उपलब्ध झाले हे बाकी खरे.

LEAVE A REPLY

*