आयपीएल क्रिकेटवर सट्टा; आठ जणांना अटक

गुन्हेशाखा युनिट १ ची कारवायी ः ४ लाखांचे साहीत्य जप्त

0
नाशिक | दि. १८ प्रतिनिधी- सध्या आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्याचा अंतिम थरार सुरू झाला आहे. काल रात्री कोलकत्ता नाईट राईटर्सविरुद्ध सनराईज हैदराबाद या दोन संघांमध्ये चुरशीचा सामना होता. सदरच्या सामन्यासाठी सट्टा लावला जात असल्याची बातमी गुन्हे शाखा युनिट १चे पोलीस कर्मचारी स्वप्निल जुंद्रे यांना मिळाली होती. सट्ट्यासाठी परप्रांतिय आल्याचीही माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सदरची बाब वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितली.

त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी पथक तयार करून वडाळा परिसरातील विधातेनगरमधील ठक्करशी इस्टेट येथील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छापा टाकला. त्यावेळी आठ संशयित हे आयपीएल क्रिकेट सामन्याचे टिव्हीवर थेट प्रक्षेपण पाहून खेळावर पैंज लावून जुगार खेळत होते.
पोलीसांनी सदरच्या ठिकाणी छापा टाकून संशयित लोकेश उर्फ लकी मनोहरलाल खत्री (३३, रा. रतन गोवर्धन अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०३, चिटणीस पार्क चौकाच्या मागे, महल, नागपूर), शरद मोहन नाकोते (४६, रा. गणेश अपार्टमेंट, फ्लॅट नं.१०१, जुने शुक्रवारी, नागपूर), महंमद शहबाज महंमद इजाज शेख (२७, रा. जोहरीपुरा, न्यु शुक्रवारी रोड, महल, नागपूर), राजेश लक्ष्मण काळे (४५, रा. गोरोबा मैदान, सीए रोड, वर्धमान नगर, सुगंध बौद्ध विहारनगर, नागपूर), साजीद वाहेद बख्त (३०, रा. कालिमंदिराजवळ, गोंदिया), अमित रमाकांत त्रिवेदी (३३, रा. इलेक्ट्रॉनिक मार्केट, सीताबर्डी, नागपूर), सुरज कलाया कमती (४०, रा. बेलॉनबगी, टोनबेहडा, जि. दरबंधा, बिहार), राजेश नथुनी कमती (२२, रा. सुहद, बेहडा, जि. दरबंधा, बिहार) यांना अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून ७९ मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय तोशिबा कंपनीचे तीन लॅपटॉप, एलईडी टीव्ही, एअरटेलचा सेटटॉप बॉक्स, १ लाख २० हजार रुपयांचे पाच पांढर्‍या रंगाच्या लोखंडी लाईन पेट्या, ज्यावर मोबाईल चार्ज करण्याची व त्याचा स्पीकर लावण्याची व्यवस्था होती. दोन महागडे पेनड्राईव्ह, ६६ लहान मोबाईल व १३ मोठे मोबाईल हॅण्डसेट, रेकॉर्डर, नेटसेटर असा सुमारे ४ लाख २२ हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, संजय पाठक, जाकीर शेख, अनिल दिघोळे, संजय मुळक, शंकर गडदे, स्वप्निल जुंद्रे, विशाल काटे, विशाल देवरे, शांताराम महाले, निलेश भोईल, गणेश वडजे, श्रीकांत साळवे, निर्मला हाके, फरिद शेख, संजय सूर्यवंशी यांच्या पथकाने बजावली

LEAVE A REPLY

*