मुंबईला आयपीएल जेतेपद

स्टिव्हन स्मिथची ५१ धावांची खेळी व्यर्थ

0
हैदराबाद | दि. २१ वृत्तसंस्था- आयपीएलच्या दहाव्या मोसमाचा रथ मजल दरमजल करत हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर पोहोचला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंटस् यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत आयपीएलच्या विजेतेपदावर मुंबई इंडियन्सने तिसर्‍यांदा आपले नाव कोरले. मुंबईने दिलेल्या १३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुण्याचा संघ निर्धारित षटकात ६ बाद १२८ धावाच करू शकल्याने मुंबई इंडियन्सचा एका धावेने विजय झाला. अखेरच्या चेंडूपर्यंत निकालाची उत्सुकता ताणली गेली होती.

मुंबई इंडियन्स विरुद्ध यंदा चमकदार कामगिरी करणार्‍या रायझिंग पुणे सुपरजाएंटस्ने अंतिम सामन्यातही पुन्हा एकदा आत्मविश्‍वासू खेळ दाखवला. पुण्याचा पहिला बळी लवकर गेला, मात्र रहाणे आणि स्मिथने मुंबईची डोकेदुखी वाढवली. दोघांनी मैदानात टिच्चून फलंदाजी करत दुसर्‍या बळीसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रहाणे (४४) धावांवर बाद झाल्यानंतरही स्मिथ आणि धोनीने सामना जिवंत ठेवला. मात्र सतराव्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर धोनीचा बळी गेला. धोनी तंबूत दाखल झाल्यानंतही स्मिथ मैदानात असेपर्यंत सामन्यात पुण्याचेच पारडे जड होते. अखेरच्या षटकात मुंबईने बाजी मारली.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला पुण्याविरुद्ध एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे पुणे संघ आत्मविश्‍वासाने मैदानात उतरला. मात्र चुरशीच्या लढतीत त्यांना अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. मुंबईकडून मिचेल जॉन्सनने ३ तर जसप्रीत बुमराहने २ गडी टिपले.
तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन निर्धारित षटकात ८ बाद १२९ धावा केल्या. मुंबई इंडियन्स विरुद्ध यंदा चमकदार कामगिरी करणार्‍या रायझिंग पुणे सुपरजायंटस्ने अंतिम सामन्यात आत्मविश्‍वासू खेळ दाखवला. पुण्याने मुंबईला १२९ धावांत रोखले. सामन्याच्या सुरुवातीलाच झटपट षटके टाकून पुण्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना गांगरून सोडले. सामन्याच्या तिसर्‍याच षटकात जयदेव उनाडकटने पार्थिव पटेल आणि सिमन्सला माघारी धाडले.
मुंबई इंडियन्सची सुरुवात अडखळत झाली. जयदेव उनाडकटच्या भेदक मार्‍यासमोर पार्थिव पटेल (४) आणि लेंडल सिमन्स (३) हे सलामीवीर माघारी परतले. अवघ्या ७ धावांवर २ गडी बाद झाल्यानंतर मुंबईचा संघ दबावाखाली आला. पुण्याच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍यामुळे मुंबईला पहिल्या पाच षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केवळ १६ धावा जमवता आल्या. रायडूला स्मिथने धावबाद केले. त्याने १५ चेंडूत १२ धावा केल्या.

रोहित शर्मा मुंबईला विजयाच्या दिशेने नेईल असे वाटत असताना झंपाच्या चेंडूवर ठाकूरने झेल घेतला. त्याच्याच षटकात पोलार्डही ७ धावांवर तिवारीकडून झेलबाद झाला. हार्दिक पंड्यानेही ९ चेंडूत १० धावा केल्या. तो ख्रिश्‍चनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू बाद झाला. करण शर्मा १ धावेवर धावबाद झाला. पुण्याच्या गोलंदाजांनी तुफान गोलंदाजी करत मुंबईच्या संघाला जेरीस आणले. वॉशिंग्टन सुंदरने ४ षटकांत अवघ्या १३ धावा दिल्या. तर ऍडम झंपाने ४ षटकात ३२ धावा देऊन २ तर जयदेव उडनकट आणि डॅनियल ख्रिस्टीनने प्रत्येकी २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : १२९/८ (२० षटके)
फलंदाज : एलएमपी सिमन्स (३), पार्थिव पटेल (४), अंबाती रायडू (१२) रोहित शर्मा (२४), कृणाल पंड्या (४७) किरॉन पोलार्ड(७), हार्दिक पंड्या (१०), करण शर्मा (१), मिचेल जॉन्सन (१३*)
अतिरिक्त : ८ गोलंदाजी : जयदेव उनाडकट (४-०-१९-२), वॉशिंग्टन सुंदर (४-०-१३-०), शार्दूल ठाकूर (२-०-७-०), लौकिक फर्ग्युसन (२-०-२१-०), ऍडम झंपा (४-०-३२-२), डॅनियल ख्रिस्तीन (४-०-३४-२).
रायझिंग पुणे सुपरजायंटस् १२८/६ (२० षटके) फलंदाज : अजिंक्य रहाणे (४४), राहुल त्रिपाठी (३), स्टिव्ह स्मिथ (५१), महिंद्रसिंग धोनी (१०), मनोज तिवारी (७), डॅनियल ख्रिस्तीन (४*) अतिरिक्त : ९
गोलंदाजी : कृणाल पंड्या (४-०-३१-०), मिचेल जॉन्सन (४-०-२६-३), जसप्रीत बुमराह (४-०-२६-२), लसिथ मलिंगा (४-०-२१-०), करण शर्मा (४-०-१८-०)

LEAVE A REPLY

*