आज IPL-१० चा महामुकाबला; मुंबई विरुद्ध पुणे अंतिम लढत

0
आयपीएलच्या दहाव्या हंगामचा आज शेवटचा सामनामुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही  संघात खेळवला जाणार आहे. आज आयपीएलचा विजेता कोण होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
आयपीएलला पुण्याच्या रूपाने नवा विजेता मिळेल की मुंबई इंडियन्स तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकेल याचा निर्णय आज रात्री हैद्राबादच्या स्टेडियमवर ठरणार आहे.
आपल्या घरच्या मैदानावर पुण्याकडून पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळावे लागले. मुंबईने ही संधी न दवडता चौथ्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईसाठी हे चौथे फायनल असेल, तर पुण्याची टीम पहिल्यांदा फायनल खेळणार आहे. पुणे संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत संतुलित आहे. दुसरीकडे मुंबईच्या फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे सध्या तरी पुण्याचे पारडे जड आहे.
दोन्ही संभाव्य संघ असे आहेत..

मुंबई इंडियन्स :रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, लेंडन सिमन्स, पार्थिव पटेल, अंबाती रायडू, नितीश राणा, केरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, कर्ण शर्मा, लसिथ मलिंगा, मिशेल जॉन्सन, मॅक्लिनघन, हरभजनसिंग.

रायझिंग पुणे सुपरजायंट्स : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, मनोज तिवारी, राहुल त्रिपाठी, डॅनियल क्रिस्टियन, लॉकी फर्ग्युसन, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, राहुल चहर.

LEAVE A REPLY

*