IPL 10: #MIvsRPS: पुणे फायनलमध्ये!

0
रायझिंग स्टार वाॅशिंग्टन सुंदर (३/१६), शार्दूल ठाकुर (३/३७) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर पुणे संघाने दहाव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये अापला प्रवेश निश्चित केला.
रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने शानदार कामगिरीच्या बळावर मंगळवारी दाेन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला धूळ चारली.
पुणे संघाने २० धावांनी सामना जिंकून पहिल्यांदा अायपीएलची अंतिम फेरी गाठली.
पहिल्यांदाच क्वालिफायरमध्ये धडक मारणाऱ्या पुणे संघाने सामन्यात चमत्कारीक खेळीच्या बळावर फायनलचे तिकीट संपादन केले. अाता पहिल्या किताबासाठी उत्सुक असलेल्या रायझिंग पुणे संघाला रविवारी फायनल खेळावी लागणार अाहे.
दुसरीकडे यजमान मुंबई इंडियन्स संघाला पुन्हा एक संधी अाहे. या टीमला बुधवारी हाेणाऱ्या (केकेआर वि. हैदराबाद ) सामन्यातील विजेत्या संघाच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल.
रहाणे (५६), मनाेज तिवारी (५८) व धाेनीच्या (४०) झंझावाती फलंदाजीच्या बळावर रायझिंग पुणे सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये यजमान मुंबई इंडियन्सला ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १४२ धावांपर्यंत मजल मारता अाली. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गाेलंदाज मॅक्लिनघन व मलिंगाने सार्थकी लावला. या दाेघांनी ३ धावांच्या फरकाने दाेन गडी बाद करून पुणे संघाला धक्का दिला हाेता.

LEAVE A REPLY

*