IPL 10: #KKRvsMI: फायनलची संधी कोणाला? केकेआर आणि मुंबई इंडियन्समध्ये आज लढत!

0
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आयपीएल क्वालिफायर-२ मध्ये शुक्रवारी सामना रंगेल. यातील विजेता संघ रविवारी पुण्याविरुद्ध फायनलमध्ये खेळेल.
साखळीत मुंबईने दोन वेळा केकेआरला हरवले होते. केकेआरविरुद्ध तिसरा विजय मिळवण्याचे मुंबईचे प्रयत्न असतील.
कोलकात्याने एलिमिनेटर सामन्यात गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबादला डकवर्थ लुइस नियमाने ७ विकेटने हरवून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश मिळवला.
दुसरीकडे दोन वेळेसची चॅम्पियन आणि गुणतालिकेतील अव्वल संघ मुंबई इंडियन्सचा पहिल्या क्वालिफायरमध्ये पुण्याकडून पराभव झाला होता.
मुंबई आणि कोलकाता हे दोन्ही संघ प्रत्येकी दोन वेळेसचे चॅम्पियन आहेत.
या दोन्ही संघांत “तिकीट टू फायनल’साठी काट्याची लढत होईल यात शंका नाही. या सत्रात मुंबईने दोन सामन्यांत केकेआरला हरवले. मुंबईने घरच्या मैदानावर केकेआरला ४ विकेटने हरवले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईने कोलकात्याला त्यांच्याच मैदानावर ईडन गार्डनवर रोमांचक ९ धावांनी मात दिली होती.

LEAVE A REPLY

*