#iPhone : आयफोन 8 सोबत आयफोन 7S लाँच होणार?

0

सध्या आयफोन 8 ची बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. सोबत आयफोन 7 चं नवीन अपडेटेड व्हर्जन आयफोन 7 एस देखील लाँच होणार असल्याची माहिती आहे.

इंटरनेटवर सध्या आयफोन 7 एसच्या डमी मॉडेलचे फोटो लीक झाले आहेत.

अॅपल पुढील महिन्यात तीन फोन लाँच करण्याची शक्यता आहे.

आयफोन 8 च्या स्क्रीनचा आकार 5.8 इंच असेल. तर बॉडी आयफोन 7 एवढीच असेल. मात्र आयफोन 7 मध्ये 4.7 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली होती.

दरम्यान आयफोन 8 मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल का, याबाबतचा सस्पेंस अजून कायम आहे.

LEAVE A REPLY

*