एक संवाद अभिनेता योगेश सोहोनीसोबत

0

१) लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती का ?

– मी अभिनयात उतरलो ते आईमुळे . मी लहान असताना आईने स्मिता तळवलकरांच्या अकॅडेमीमध्ये घातलं होत . तिथेच संदेश कुलकर्णी भेटले . त्यानंतर  आता जी मालिका मी केली  “अस्मिता ” त्याचे दिग्दर्शक संदेश कुलकर्णी तिथे होते. त्यांच्यासोबत सहदिग्दर्शकाच काम केल . त्यानंतर हि आवड वाढत गेली. याच क्षेत्रात मी करिअर करायचं अस ठरवलं . तस मी बी .ए केल आहे . पण ते डिग्री हवी म्हणून.

२ ) घरच्यांचा कसा पाठींबा मिळाला ?

– घरच्यांचा प्रचंड पाठींबा मिळतो.  माझी आई सतत वेगवेगळे कार्यशाळा कराव्यात यासाठी मला प्रोत्साहित करते . माझ डाएट संभाळण.  काय हव नको याकडे लक्ष देण. अशा छोट्या छोट्या गोष्टीमार्फत ते मला सपोर्ट करतात आणि माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत .

३ ) आईच्या हातचे कोणते पदार्थ आवडतात ?

– सगळ्यात आवडता पदार्थ रव्याचा केक , खांडवी. आई हे पदार्थ उत्तम करते. त्याशिवाय उकडीचे मोदक. याबाबत मी अगदी खवय्या आहे . आईच्या हातचे ब्रेड आलू चीज टोस्ट मला अतिशय आवडतात.

४ ) अशा बिझी शेड्युलमध्ये फिटनेससाठी कसा वेळ काढतोस ?

– मी माझ्या आवडीचे पदार्थ खातो पण फक्त रविवारी . म्हणजे रेगुलर एक्सरसाइज करतोच . जिम मध्ये जातो पण त्याचबरोबर बाहेरच खाण टाळतो . फक्त दर रविवारी काही तरी बाहेरच खातो .

५ ) अभिनय सोडून इतर काय आवडीनिवडी आहेत ?

– मला वाचनाची आवड आहे . ट्रेकिंग आवडते . पुष्कळ ठिकाणी मी फिरलो आहे . पण सिंधुदुर्गचा ट्रेक माझ्या कायम स्मरणात राहील. इतिहासकार निनाद बेडेकर यांच्यासोबत हा ट्रेक केलेला . अगदी बोटांवर मोजण्याइतके  लोक होते आणि निनाद बेडेकरांनी त्यावेळी अमुल्य अशी माहिती आम्हाला सांगितली होती .

६ ) अभिनेता नसतास तर कोणत्या क्षेत्रात करिअर करायला आवडले असते ?

– एक तर मला बिझनेस करायला आवडला असता कारण खास करून कन्स्ट्रक्शन बिझनेस आणि दुसरा पर्याय म्हणजे संगीत क्षेत्र ज्यामध्ये मला करिअर करायला आवडलं असत . कारण बरेच संगीत कार्यक्रमांसाठी मी सूत्रसंचालन करतो. झाकीरभाईंच्या कार्यक्रमांसाठी मी देखील मी सूत्रसंचालन केल आहे. त्यामुळे या लोकांच आयुष्य जवळून अनुभवायला मिळाल म्हणुनच कदाचित या क्षेत्राचे मला आकर्षण आहे.

७ ) सिनेमा क्षेत्रात काही विशेष काम करायला आवडेल का ?

– नक्कीच . मला ऑर्गनायझिंगची आवड आहे .एखाद प्रॉडक्शन हाउस काढायचं आहे .ज्यामध्ये अभिनेता हा सर्वांगाने उत्तम हवा. क्रिएटिव्ह वर्क आणि इकोनॉमिकली वेल सेटल्ड अशा सुविधा त्यामध्ये हव्या.

– ऋचा दीक्षित

LEAVE A REPLY

*