आंतरराष्ट्रीय ‘सूला फेस्ट’चे आयोजन; तिकीट विक्रीला सुरूवात

0
सातपूर । नाशिकच्या वाईनला खर्‍या अर्थाने कोंदण देणार्‍या सूला फेस्टचे आकर्षण नाशिककरांनाच नव्हे तर देश विदेशांतील पाहुण्यांना राहत असल्याने ‘सुला फेस्ट’ कडे लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत. तयामुळे यंदो सुला फेस्टने बुक माय शो च्या माध्यमातून तिकीट विक्री सुरू झाली असून, दि.3 व 4 फेब्रुवारीला संगीतप्रेमींना नावाजलेल्या संगीतकारांच्या संगिताचा आनंद घेता येणार आहे.

भव्य दिव्य अशा सुला फेस्टच्या गेल्या दहा हंगामात लाखो संगीतप्रेमींनी हजेरी लावत महोत्सवाचे साक्षीदार बनले होते. अनेक संगीतप्रेमी तर दर वर्षी आवर्जुन सुला फेस्टला भेट देत असतात. प्रसन्न करणारे संगीत ऐकण्यासोबत वाईन अन् लज्जतदार पदार्थांची मेजवानी जीवन परीपूर्ण बनविणारा अनुभव देणारी ठरणार आहे.

सुलाच्या जगप्रसिद्ध वाईनच्या जोडीला जगभरात नावाजलेल्या ब्रँड्सच्या 30 हून अधिक वाईन, स्पीरीट्सचा समावेश सुला फेस्टमध्ये असणार आहे. तर हेडलायनरबाबत सांगायचे झाल्यास प्रसिद्ध इंग्लीश इलेक्ट्रोनिक फोक बँड क्रीस्टल फायटर्स भारतात पहिले सादरीकरण करतांना 2018 च्या सुला फेस्टचा हेडलायनर ठरणार आहे. अनेक पुरस्कार जिंकलेला पारोव्ह स्टेलर आका, ब्रिटीश बँड द बीट फिट, रँकींग रोजर, गिप्सी हिल यांच्यासह बाऊचक्लाग अशा नामांकित बँड्सचे सादरीकरण संगीत महोत्सवातून पाहण्याची संधी मिळणार आहे.

नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेला यंदाचा सूला फेस्ट द्वारे भरपुर नवीन गोष्ट रसिकांपुढे आणणार आहे. फेस्टमध्ये शंभरहून अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंत आपली कला सादर करण्यात उत्सुक आहेत. वेगवेगळ्या 25 शैलीत 30 देशांतील कलाकार आपली कला सुला फेस्ट मध्ये सादर करणार आहेत.

जगभरातील नावाजलेल्या संगीत महोत्सवामध्ये सादरीकरण केल्यानंतर इंग्लीश इलेक्ट्रॉनिक फोक बँड क्रिस्टल फायटर आपल्या अनोख्या संगीत शैलीसह सुलाच्या व्यासपीठावरही यंदा कला सादर करणार आहे. तसेच विविध पुरस्कार विजेता पारोव्ह स्टेलर आका यानं इलेक्ट्रो स्वींग या शैलीचा शोध घेतलाय. त्यासोबतचत टोनी बेनेट, लेडी गागा, मारर्विन गये, लाना डेल रे, अरोप चुपा व यांसारख्या अनेक नावांचा समावेश आहे.

ब्रिटीश बँड ‘द बिट फिट रँकींग रोजर’च्या सादरीकरणाचा अनुभव अन्य कुठेही न मिळणारा आहे. अनेक हॉलिवूड चित्रपटात संगीत देणार्‍या या बँडच्या सादरीकरणाचा अनुभव सुला फेस्टमध्ये घेता येणार आहे. ऑस्ट्रीयाचा बऊचलँग आपल्या बिटबॉक्स कौशल्यानं जगभर ओळखला जातो. बाऊचलँग कधीही न ऐकलेल्या अशा सुमधुर संगीताची अनुभूती देतो. तर गॅस्पी हिल बँड बालकन ब्रास, मेडीटरेशन सर्फ रॉक, स्का व स्वींग यांचे मिश्रण होय. गिटार, हॉर्नस् टुबा, स्क्रॅच डीजे व अन्य इलेट्रॉनिक बिट्ससह हा बँड सुंदर असे सादरीकरणास सज्ज झाला आहे. युके व अमेरीकेतील भव्य अशा फेस्टीव्हल्समध्ये बँडचे सादरीकरण झालेले आहे.

अश्या वैविध्यपूर्ण कलागूणांद्वारे यंदाचा सूला फेस्ट संस्मरणीय होणार असल्याने आपली निराशा टाळण्यासाठी आज पासून सूरू होणार्‍या बूक माय शो च्या माध्यमातून बूकिंग करण्याचे आवाहन सूला तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*