INSTA: केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचा फोटो रिपोस्ट करत किंग खानने केला खुलासा

0

शाहरुखने एक फोटो पोस्ट करत त्यामध्ये स्मृती इराणींचाही उल्लेख केला आहे.

मुख्य म्हणजे त्याने पोस्ट केलेला हा फोटो स्मृती यांच्या मुलीचा आहे.

हा फोटो पाहताना प्रथमदर्शनी किंग खानने नेमका तिचा फोटो का पोस्ट केला असावा आणि त्यांचं नातं तरी काय आहे असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

स्मृती इराणी यांचे पती जुबिन इराणी आणि शाहरुख खान हे बालपणापासूनचे मित्र आहेत. स्मृती इराणींनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेनेलचा फोटो पोस्ट केला होता. तोच फोटो किंग खानने रिपोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये आपणच शेनेलचं नाव ठेवलं होतं असं सांगितलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने शेनेलची प्रशंसाही केली आहे.

LEAVE A REPLY

*