आयकरकडून पतसंस्थांची तपासणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – मुंबई व पुण्याच्या आयकर शाखांकडून शहरातील काही पतसंस्थांची तपासणी सुरू आहे. या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्री काही पतसंस्थांचे दप्तर ताब्यात घेतले आहे. त्यांची चेक व्यवस्था, पासबुक, संचालक मंडळ, बँक व्यवहार, खातेदारांची रक्कम अशा अनेक बाबींची चौकशी सुरू असल्याची माहीती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन या पथकांनी शहरातील पतसंस्थांना टारगेट केले आहे. तसेच रविवारी (दि.28) पाईपलाईन रोडवरील एका पतसंस्थेच मुंबईच्या आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली आहे. पतसंस्थेत चाललेल्या घटनेची रात्री उलटसुलट चार्च सुरू होती.

LEAVE A REPLY

*