#INDvsWI : पहिली वनडे पावसामुळे रद्द

0
यजमान विंडीजविरुद्ध सलामीच्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाचे अजिंक्य रहाणे (६२) अाणि शिखर धवन (८७) चमकले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ३९.२ षटकांपर्यंत ३ गड्यांच्या माेबदल्यात १९९ धावांची खेळी केली.
यजमान विंडीजकडून जाेसेफने एक विकेट घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात अाला.
नाणेफेक जिंकून यजमान विंडीज संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाकडून रहाणे अाणि धवनने दमदार सुरुवात केली. त्यांनी गाेलंदाजी फाेडून काढत झंझावाती फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी १३२ धावांची भागीदारी केली.
अजिंक्य रहाणेने सामन्यात कर्णधार विराट काेहलीने सलामीच्या दिलेल्या संधीचे साेने केले. त्याने ७८ चेंडूंचा सामना करताना ८ चाैकारांच्या अाधारे शानदार ६२ धावांची खेळी केली.

LEAVE A REPLY

*