#INDvsSL : दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका 2 बाद 50

0
टीम इंडियाने शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत काेलंबाेच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडला.
भारताने दुसऱ्या दिवसअखेर ९ बाद ६२२ धावांवर अापला पहिला डाव घाेषित केला. यासह भारताने विक्रमी धावांचा डाेंगर रचला.
अश्विनने १४० वर्षांच्या कसाेटी क्रिकेटमध्ये एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली. फिरकीच्या जाळ्यात अडकल्याने यजमान श्रीलंकेची खडतर लक्ष्यच्या प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात केली.
श्रीलंकेने दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद ५० धावा काढल्या. अाता मेंडिस (१६) अाणि कर्णधार दिनेश चांदिमल (८) मैदानावर खेळत अाहेत.
भारताने सलग दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ६०० पेक्षा अधिक धावा काढल्या.
भारतीय संघाने ३ बाद ३४४ धावांवर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली.
अजिंक्य रहाणेने १३२ धावांची खेळी केली. अश्विन (५४), वृद्धिमान साहा (६७) व रवींद्र जडेजाने (५०) नाबाद अर्धशतके ठाेकून टीम इंडियाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला.

LEAVE A REPLY

*