भारताला विश्वगूरू बनवावे – मोहन भागवत

0
सातपूर । भारताला आपल्या क्षमतांच्या आधारावर विश्वगूरू बनण्यासाठी प्रयत्न करावे, महासत्ता बनलेल्या देंशांची स्थिती काय झालेली आहे. ती आपण पहातोच आहोत. त्यामुळे या फंदात न पडता आपण सर्व देशांशी समन्वय साधून संबंध प्रस्थापित करण्यावर भर देण्यातून विश्वगूरू बनण्यासाठी प्रयत्न करण्याचा सुतोवाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर्सच्या नुतन पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण सोहळा मुंबई येथील लटीट्यूड प्रमुख पाहुणे म्हणून श्री भागवत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर विशेष अतिथी म्हणून केंद्रिय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रिय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, विद्यमान अध्यक्ष रामचंद्र भोगले, वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत हे होते.

यावेळी श्री भागवत यांनी भारताच्या सकारात्मकतेवर प्रकाश टाकला. भारताने नेहमीच जगाला शांततेचा संदेश दिला आहे. आपण जसे पेरतो तसेच दुपटीने उगवते. तद्वत आपण जसे देऊ तसेच दुपटीने परत येईल. आपल्याला जगाला शांती व सद्भावनेचा संदेश देताना भारताला जगाचा विश्वगूरू बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी संरक्षण खात्याच्या विविध योजनांची माहीती देऊन देशांतर्गत संरक्षण विभागाच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यांसाठी 5 जिल्हांचे क्लस्टर तयार करण्यात आले असून, त्यात नाशिक, पूणे, मुंबई, औरंगाबाद, व नगर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याबाबतची नोटीफिकेशनही जारी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या माध्यमातून मेक इन इंडीयाला मोठ्या प्रमाणात चांगल्या पध्दतीने राबविण्यात येईल, संरक्षण क्षेत्रात भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना यासाठी लागणार्‍या सेवा सुविधा सुलभ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठीची लायसन्स प्रणालीही सूलभ करण्यात आली असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. जास्तीत जास्त उद्योजकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. भामरे यांनी शेवटी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भूषण मतकरी यांनी केले. तर आभार चेंबरचे माजी अध्यक्ष अरविंद दोषी यांनी मानले.

यावेळी माजी खासदार भरतकुमार राऊत,महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष अमीलाल आनंदपारा, विक्रम सारडा, खुशाल पोद्दार, दिग्विजय कापडीया, हेमंत राठी, मिनल मोहाडीकर, आशिष पेडणेकर, मानसिंग पवार, श्री शेकटकर, निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, आयमा अध्यक्ष राजेंद्र अहिरे, आदींसह विविध व्यापारी व उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*