सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

0

वडांगळी,(वार्ताहर) ता १५ : वडांगळी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजावंदन करण्यात आले. गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुनिता सैद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर जि. प. प्राथमिक शाळेत जि. प. सदस्या वैशाली खुळे व शिवसेना तालुकाप्रमुख दिपक खुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती गुळवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास खुळे, शिक्षक दिलीप सानप, दिलीप गोसावी, अंकुश पवार, आदींसह सुदेश खुळे, रामदास खुळे, दिनकर खुळे, गणेश कडवे यावेळी उपस्थित होते.

विविध कार्यकारी सोसायटी मध्ये ज्येष्ठ नागरिक रघुनाथ खुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन सचिन खुळे, व्हा. चेअरमन नितीन खुळे आणि सर्व सदस्य उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी रंगनाथ रावजी खुळे, प्राचार्य शरद रत्नाकर शालेय स्कुल कमिटीचे सर्व सदस्य, माता पालक संघाच्या सर्व सदस्या, उपस्थित होते.

यावेळी शाळेतील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. आईसेवा फांऊडेशन सिन्नर, अश्विनी ड्रेसेस सायखेडा, गोंदेश्वर रोटरी क्लब सिन्नर, यांसारख्या अनेक संस्था व नागरिकांनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.

यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य शरद खुळे, विनायक खुळे, किशोर खुळे, वृषाली खुळे, वंदना सुर्यवंशी, मंगेश जंगम, कारभारी वारुंगसे, खंडु खुळे, रावसाहेब खुळे, रावसाहेब तांबे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*