संगणक शिक्षकांना सर्व शिक्षण अभियानात सामावून घ्या

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राज्यातील बेरोजगार संगणक(खउढ) शिक्षकांना नियमित करण्यात यावे, असा प्रस्ताव प्रस्ताव नुकताच शिक्षण खात्याने केंद्राकडे पाठविला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉ.शरद संसारे व सरचिटणीस कॉ.जीवन सुरुडे यांनी दिली आहे.
राज्यातील बेरोजगार संगणक(ICT) शिक्षकांना नियमित करण्यात यावे, 1 व 2 जुलैच्या घोषित शाळांना अनुदान द्या, अघोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना पात्र घोषित करून अनुदान द्या, अपंग समावेशीत शिक्षकांना पुनर्स्थापना देऊन सर्वांचे समायोजन करा या सह असंख्य प्रश्‍न असलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यातील भिडे वाड्यापासून मुंबई येथील शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत चालत शिक्षण बचाव पदयात्रा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली दि.17 जुलै ते 23 जुलै 2017 दरम्यान काढण्यात आली होती.
पदयात्रेच्या समारोपावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील बेरोजगार संगणक शिक्षकांना सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून innovation management (नाविन्यपूर्ण उपक्रम) च्या माध्यमातून सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवार दि. 2 ऑगस्ट 2017 रोजी शिक्षणमंत्र्यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान याना सर्व शिक्षण अभियान अंतर्गत (नाविन्यपूर्ण उपक्रम) च्या माध्यमातून सामावून घेण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉ.शरद संसारे व सरचिटणीस कॉ.जीवन सुरुडे यांनी दिली आहे यांनी दिली.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 3000 व अहमदनगर जिल्यातील शेकडो बेरोजगार संगणक शिक्षक (ICT) यांना दिलासा मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन शासनाचे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्यात शिक्षण बचाव पदयात्रेमुळे यश आल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक आमदारांचे जिल्ह्यातील संगणक शिक्षक अमोल दिघे, पंकज रंधे, लखन डांगे, अमोल तनपुरे, स्वप्नील बर्गे, दत्ता पांडे, मनोज आभाळे, गणेश वाणी, संजय वाघेला, सचिन काकडे, नितीन बनकर, अमोल वामन, ज्ञानेश्वर तेलोरे आदींसह सर्व शिक्षकांकडून कौतुक होत होत आहे.

LEAVE A REPLY

*