अत्याचाराची ‘ती’ घटना बनाव!

0

पारनेरच्या गुंडांचा कारनामा, विरोधकांना अडकविण्याचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी) – पुण्यातील उरुळी कांचनमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेली सामूहिक बलात्काराची घटना बनाव असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. वैयक्तिक भांडणातून पारनेरमधील दोन गुंडांनी महिलेला हाताशी धरून विरोधक असलेल्या दोन तरुणांना अडकवण्यासाठी हा बनाव रचला असल्याची बाब तपासात समोर आल्याची माहिती लोणीकाळभोर पोलिसांनी दिली.
जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात शुक्रवारी रात्री लिफ्टच्या बहाण्याने फॉर्च्युनर गाडीत दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. या तपासात पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण परिसरातील दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे या गुंडांनी पूर्ववैमनस्यातून हा कट रचल्याचे उघड झाले आहे.
प्रकाश चव्हाण आणि अजय नवले या दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी परिसरातीलच एका महिलेला हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात समोर आले. तर बलात्काराच्या घटनेची साक्ष देणारे दोन तरुणही पैसे देऊन आणले होते.
दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे यांच्या सांगण्यावरुन खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली संबंधित महिलेने पोलिसांना दिली आहे. महिलेच्या तक्रारीत त्रुटी असल्याचे पोलिसांना तपासात समोर आले. त्यानंतर अधिक तपास केला असता, प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठवण्यासाठी बलात्काराचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अवघ्या 48 तासांत या प्रकरणचा उलगडा केला. पोलिस तपासात महिलेची तक्रार बनावट असल्याचे जाणवले आणि हा कट उघड झाला.

  देवदर्शन करुन नारायणपूरहून परतत असताना, एकटी असल्याचे पाहून फॉर्च्युनरमधून आलेल्या दोन तरुणांनी लिफ्ट देण्याचा बहाणा केला. त्यानंतर शिंदवणे घाटात दोघांनी बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली होती. शिवाय त्या दोघांना आणि गाडीचा नंबर पाहिलेले दोन साक्षीदारही उभे केले होते.

पोलीस गव्हाणे, जगदाळेच्या शोधात पोलीस गव्हाणे, जगदाळेच्या शोधात –  चव्हाण आणि नवले यांच्याशी दादा गव्हाणे यांचा काही वर्षांपासून वाद सुरु आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी गव्हाणे आणि जगदाळेनी त्या दोघांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिलेला आणि दोन तरुणांना सोबत घेऊन गव्हाणे आणि जगदाळेने बलात्काराचा हा बनाव रचला. पोलीस सध्या दादा गव्हाणे आणि संदीप जगदाळे यांच्या शोधात आहेत.

LEAVE A REPLY

*