कॉलेजरोडवरील मॉलमध्ये चालायचे स्पाच्या नावाने अनैतिक व्यवसाय; पोलिसांचा छापा

0

नाशिक | दि.२४ प्रतिनिधी : नाशिक सिटी पोलिसांच्या कारवाईत आज दुपारी काॅलेजरोडवरील हॉलमार्क चौकातील एक्झाॅटिक स्पा येथे छापा टाकत मोठी कारवाई केली.

शहरातील एका बड्या असामीशी संबंधित मॉलमध्ये वरच्या मजल्यावर हे उद्योग गेल्या अनेक दिवसांपासून बिनदिक्कत सुरु असल्याने या उद्योगांवर नेमका कुणाचा आशीर्वाद मिळतो अशी चर्चा शहरात सुरु आहे.

एकूण १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात ८ मुली व ५ मुलांचा समावेश आहे. स्पा सेंटर गंगापूर पोलिसांकडून सील करण्यात आले आहे. दोषींवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त होते आहे.

पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश देवीकर यांनी महिला पोलिसांच्या पथकासोबत येथील एक्झाॅटिक स्पा सेंटरवर धाड टाकत कारवाई केली.

LEAVE A REPLY

*