इगतपुरी, त्र्यंबकची निवडणूक जाहीर; १० डिसेंबरला मतदान, ११ ला मतमोजणी

0
त्र्यंबकेश्वर | त्र्यंबकेशवर आणि इगतपुरी या बहुप्रतीक्षित नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज जाहीर झाला. दिनांक १० डिसेंबरला मतदान आणि ११ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती आज राज्य निवडणूक आयोगाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

दोन्ही ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत असेल.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

यासोबतच सटाणा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ अ च्या पोटनिवडनुकीचा कार्यक्रमदेखील आजच जाहीर करण्यात आला असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या निवडणुकीच्या दिवशीच येथील पोटनिवडणूकदेखील पार पडणार आहे.

दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान केंद्रावर मतदान पार पडेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.

LEAVE A REPLY

*