इगतपुरीच्या रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर ७ अल्पवयीन मुलींचे शोषण; पुण्याच्या कंपनी संचालकांसह १५ मद्यपींना अटक

0

इगतपुरी । दि ४ प्रतिनिधी :   बलायदुरी ता. इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट ह्या पंचतारांकित हॉटेलात काल रात्री उशिरा इगतपुरी पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत १५ जणांना ताब्यात घेतले आहे. या हॉटेलमधून ७ अल्पवयीन मुलींनाही ताब्यात घेतले आहे.

अटक केलेल्यांपैकी काही जण पुण्यातील एका कंपनीचे संचालक असून पार्टीत सामिल असलेल्या अर्धनग्न नृत्य करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याने बालिकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण (पॉस्को) कायद्याखाली संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

त्यांच्यावर विनापरवाना नृत्य करायला लावणे, महिलांशी बिभत्स वर्तन आदि विना परवाना रिसॉर्टमध्ये मद्यपार्टी आयोजित करणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच हॉटेलचा मालक हा मुंबईतील असून या प्रकरणी तेथील मॅनेजरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निसर्गसौंदर्याने विपुल असलेल्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायातील असभ्य संस्कृतीमुळे पुन्हा एकदा तालुका चर्चेत आला आहे. महामार्गापासून 2 किमी अंतरावर असलेल्या ग्रामीण वातावरणातील हॉटेलबाबत यापूर्वी अनेक तक्रारी असल्याने इगतपुरी पोलिसांनी अचानक कारवाई केली. यासह संबंधित हॉटेल मालक दडपशाही करून ग्रामीण जनतेच्या जमिनी घशात घालीत असल्याच्याही तक्रारी आहेत.


इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी भागातील रेन फॉरेस्ट हॉटेलातील मद्य व अर्धनग्न नृत्य पार्टीवर इगतपुरी पोलीसांनी रात्री छापा टाकला. यातील तरुण आणि तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. काल मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, महिला सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. पांढरे यांच्यासह पोलीस हवालदार लोहरे, विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, हेमंत मोरे, मारुती बोराडे, साहारे आदी पथकाने रेन फॉरेस्ट रिसॉट येथे धाड टाकली असता तेथे अर्धनंग्न अवस्थेत मद्य पित नृत्य असल्याचे आढळून आले.

इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी संशयित प्रशांत काशिनाथ सोंडकर ( वय-२७ ) रा.दिडहार, ता.भोर, पुणे. विश्वास विठ्ठल सोंडकर ( वय- ४५) रा.मांगालेवाडी, कात्रज, पुणे.गंगाधर भाऊसाहेब शिंदे ( वय-४२) रा.मनोली ता.संगमनेर, नगर. अनंत हरीहर भाकरे ( वय-५१ ) लिबर्टी हाईटस, नाशिक.उमेश जिभाऊ शेवाळे ( फरार ) सर्व.जी.एम.बायोसाईटस प्रा.ली.कंपनीचे संचालक आहे. तर संजय वसंत सोनवणे ( वय-३८ ) पाथर्डी फाटा, नासिक. प्रथमेश संजय सोनवणे ( वय-२० ). रामकृष्ण एकनाथ सांगळे ( वय-२० ) रा. मोरवाडीगाव नाशिक यांना अटक केली आहे.

अटक केलेल्या युवतीची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. सर्व आरोपींची इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी सुरू आहे. कारवाईत पोलीसांनी डी.जे.साहित्य, एक कार आदी साहित्य जप्त केले आहे.

या हॉटेलात अनेक गैरप्रकार चालत असल्याचा दाट संशय स्थानिक ग्रामस्थांना येत असतो. मात्र हॉटेल मालक दहशत करील ह्या भीतीने ग्रामस्थ गप्प होते. संबंधित मालक गावातील अनेकांच्या जमिनी घशात घालीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

दरम्यान आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रामुळे आणि निसर्ग सौंदर्यामुळे जगाच्या नकाशावर प्रसिद्‌ध झालेला इगतपुरीचा परिसर अलिकडे अशा उच्चभ्रूंच्या पार्ट्यांनी चर्चेत आला आहे. अशा पार्ट्यांमध्ये अनेकदा मॉडेल किंवा वेश्या व्यवसायातील मुलींनाही आणून गैरप्रकार केला जात असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यातील अनेक मुली या अल्पवयीन असतात व मनाविरूद्ध या प्रकारात ढकलल्या जातात. मध्यंतरी याच परिसरात बॉलीवूडमधील एका मॉडेल आणि अभिनेत्रीचा खून करण्यात आला होता. अनेकदा मुली किंवा महिलांचे शोषणही या प्रकारामुळे होत असले तरी अशी प्रकरणे दडपली जात असल्याने ती माहित पडत नाहीत.

बारवरील धाडीत ‘या’ सनदी अधिकाऱ्यांची मुले सापडली…अशी आहेत नावे

LEAVE A REPLY

*